आज दिनांक 28 ऑगस्ट 2019 ला केंद्र शाळेमध्ये ब्रम्हपुरी व वायगाव केंद्राचे केंद्रस्तरीय TAG कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले .मुख्य मार्गदर्शक श्री.एम.इ. खोब्रागडे सरांनी शिक्षकांना इंग्रजी संभाषणाच्या दृष्टीने उपयुक्त मार्गदर्शन केले .इंग्रजीमध्ये Story Telling & Story Making कौशल्य विकास साधणे , Wh Que When पासून सुरु होणारे प्रश्न विचारणे, दिलेल्या विषयावर विद्यार्थ्यांना बोलते करणे यासंदर्भात उपयुक्त मार्गदर्शन केले .
गटशिक्षणाधिकारी श्री. प्रमोद नाट यांनीसुद्धा इंग्रजी भाषेतील मूलभूत क्षमता विकसित करण्याचेआवाहन केले. स्वतःच्या शाळेत इंग्रजी विषयक काय स्वप्न आहेत ते शिक्षकांकडून जाणून घेतले. माननीय नाट साहेबांनी शिक्षकांशी इंग्रजीतून संवाद साधला .शिक्षकांनी सुद्धा इंग्रजीमध्ये चांगला प्रतिसाद दिला .अशा प्रकारच्या वातावरणातून शिक्षकांच्या मनातील इंग्रजी विषयक असलेली भीती नाहीशी होईल हा आशावाद ठेवायला हरकत नाही

No comments:
Post a Comment